Pages
Wednesday, February 29, 2012
संतांनी आमच्यावर संस्कार केले
रक्तच मराठी मराठी शिवाय जात लावत नाही
मरणाला घाबरणारे आम्ही नाही
नेहमी मरणच घाबरल हिम्मतीला मराठ्यांच्या
साक्ष आहे त्या सह्याद्रीच्या कड्यांची
जिथे घोट घेतला मराठ्यांनी शत्रूंच्या नरडीचा
संतांनी आमच्यावर संस्कार केले
शिवाजी राजांनी आम्हाला हिम्मत दिली
शंभूराजांनी शिकवला स्वाभिमान मराठ्याचा
जिजावूंनी पाजले बाळकडू वीरपुत्र घडवण्याचे
जीवावर उदार झाले मावळे मराठी मातीसाठी
रक्ताचा अभिषेक केला राजांनी स्वराज्यासाठी
शूरांचा इतिहास आमचा उगाच बडाया मारत नाही
मराठी आम्ही, रक्तच मराठी मराठीशिवाय जात लावत नाही
वेळ आला तर प्राण देवू पण स्वाभिमान आमचा झुकत नाही
सह्याद्रीपुत्र आम्ही उगाच कुणाच्या वाटेला जात नाही
आलाच जर कोणी आडवा उभा चीरल्याशिवाय सोडत नाही'
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment