Pages

Saturday, September 8, 2012

कितीही नाही म्हणटल तरी तुझ्या कडेच धावत


कितीही नाही म्हणटल तरी तुझ्या कडेच धावत ..........
डोळे बंद केले की तू असल्याचा भास होत
डोळे उघडले की तू नसल्याचा त्रास होतो
तू नसतानाही तू असल्याचा आभास होतो
तू नसतानाही तू माझी असल्याचा भास होतो

या भासातून तू कधी माझी होशील का?
कि हा भास भासच राहील,
तुझ्या भेटीसाठी मी आतुर आहे
कि तुझ्या भेटीविना ये जीवन संपून जाईल ...

संपवायला काय हे जीवन संपून जाईल
पण ते तुझ्याविना संपले याची हुरहूर राहील.
तुझ्याविना जगण्यापेक्षा तुझ्यासाठी जगणे मला आवडेल
तुला माझी करण्यापेक्षा तुला सुखात पाहणे मला आवडेल

बघ किती वेडा आहे मी आणि माझ मन
सतत तुझ्याच आठवणीत असत
कितीही नाही म्हणटल तरी
तुझ्या कडेच धावत

कितीही नाही म्हणटल तरी
तुझ्या कडेच धावत .................

No comments:

Post a Comment