***अधूरं प्रेम***
माझ्या सावली सारखिच तू माझ्या बरोबर होती,
काहीशी मागे-मागे तू, म्हणूनच अस्तित्वाची जाणिव होती,
तुझ्या वेणीतल्या मोग-याच्या सुगंधाने, हृदयाचा ठोका चुकवला होता,
मन त्या सुगंधा पाठी न जाता, नुसताच भोवताली गस्त घालीत होता,
जीवनात तू मनाला प्रसन्न करणा-या, सुगंधासारखी दरवळून गेली,
तुझ्या प्रेमाची चाहूल अजन्म मनाला आनंदाची हुरहूर लावून गेली,
आज जिवंत आहे आपल्या प्रेमाची म्हतारी साठवण,
तुझ्याबरोबर जगलेल्या प्रत्येक क्षणाची मखमली आठवण,
दोघांच्या आयुष्यातले ते दोनच क्षण आपुले,
आज फ़क्त मेलो नाही म्हणून तसेच जिवंत राहीले........

No comments:
Post a Comment