Pages

Saturday, September 8, 2012

दोन फुलपाखरे प्रेमात पडली होती

दोन फुलपाखरे प्रेमात पडली होती...एके दिवशी ते लपा-छपि खेळत होते, खेळताना .......

मुलगा फुलपाखरू :- चल एक छोटासा नवीन खेळ आपल्या दोघांच्यात ....

मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !!

मुलगा फुलपाखरू :- आपल्या दोघांमध्ये, सकाळी सकाळी ह्या समोरच्या फुला मध्ये जो सर्वात प्रथम बसलेला असेल तो दुसऱ्या पेक्षा जास्त प्रेम करतो ....

मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !!

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी, मुलगा फुलपाखरू त्या फुलाच्या जवळ येऊन उभा राहिला आणि ते फुल उमलण्याची वाट पाहू लागला जेणेकरून तो तिच्या आधी त्या फुलामध्ये बसेल आणि तिला दाखवून देईल कि त्याचे तिच्यावर खूप खूप प्रेम आहे .

थोड्याच वेळात फुल उमलले ........ पाहतो तर काय ????????????
ती मुलगी फुलपाखरू त्या उमलेल्या फुला मध्ये मरून पडली होती ........ कारण, रात्रभर ती त्या फुला मधेच राहिली होती फक्त ह्या वेड्या अपेक्षेने कि सकाळ होताच आणि ते फुल उमलताच ती त्या मुलगा फुलपाखरू कडे आनंदाने झेप घेईल आणि त्याला दाखवून देईल कि ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करते ते ....

अधूरं प्रेम


***अधूरं प्रेम***
माझ्या सावली सारखिच तू माझ्या बरोबर होती,
काहीशी मागे-मागे तू, म्हणूनच अस्तित्वाची जाणिव होती,

तुझ्या वेणीतल्या मोग-याच्या सुगंधाने, हृदयाचा ठोका चुकवला होता,
मन त्या सुगंधा पाठी न जाता, नुसताच भोवताली गस्त घालीत होता,

जीवनात तू मनाला प्रसन्न करणा-या, सुगंधासारखी दरवळून गेली,
तुझ्या प्रेमाची चाहूल अजन्म मनाला आनंदाची हुरहूर लावून गेली,

आज जिवंत आहे आपल्या प्रेमाची म्हतारी साठवण,
तुझ्याबरोबर जगलेल्या प्रत्येक क्षणाची मखमली आठवण,

दोघांच्या आयुष्यातले ते दोनच क्षण आपुले,
आज फ़क्त मेलो नाही म्हणून तसेच जिवंत राहीले........

खरच तुला माझ्या जीवनातून जायच होत का?


खरच तुला माझ्या जीवनातून जायच होत का?
खरच तुला माझ्या जीवनातून जायच होत का?
प्रेमाच्या सुंदर जगात मला दुःख द्यायचे होते का?

पहिल्याच भेटीत माझे हृदय मी तुला दिले
हृदयातच नव्हे तर मनासुद्धा तुलाच बसविले
परंतू खरच प्रेमात मला फ़क्त फ़सविले
कधी न रडणार मी, पण मला तू रडविले

फ़ुलात मी खेळून होतो काट्यात मला टाकायचे होते का?
प्रेमाच्या या सुंदर जगात मला दु:ख द्यायचे होते का...

माझे तुझ्यावर प्रेम होते, आहे, आणि यापुढेही असणार
पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याशिवाय ते कुणावरहि नसणार
माझी तर तू झाली नाहिस, पण आता मीही नाही कुणाचा होणार
आणि खरच प्रेम करण्याची शिक्षा मला नक्कीच मिळणार

आज का डोळ्यात माझ्या पाणी पुन्हा दाटले होते


आज का डोळ्यात माझ्या पाणी पुन्हा दाटले होते..
आज का डोळ्यात माझ्या
पाणी पुन्हा दाटले होते...
कासाविस या व्याकुळ आत्म्यात
आभाळ भरून साठले होते...

आज का मन पुन्हा
माझ्यातच हरवले होते...
मज स्वतः आज बेरंग करून
जग रंगात रंगत होते...

आज एकांतात ह्रदय माझे
आपलीच स्पंदन शोधत होते...
आज स्वतःशी हसून सुद्धा
मन आतून रडत होते...

आज पुन्हा काही कवडसे
माझी सावली शोधत होते...
पालटून आज काळlची पाने
मज स्मरण तुझे होत होते...

आज तुझ्या नसण्याने  पुन्हा
ह्रदय अंधारात धड़कले होते...
बंध जरी तुटले सारे
तरी पंख पिंजर्.यातच  अडकले होते...
तरी पंख पिंजर्.यातच  अडकले होते..

तु ये


…तु ये
…तु ये

श्वास उष्टा होईल श्वासाने
जवळ इतक्या लाजुन तु ये,
शहारावे अंग माझेही
स्पर्शामध्ये तेवढे अंतर ठेऊन तु ये.

घ्यायचा आहे गंध तुझा
कळी सारखी खुलुन तु ये,
विसरायचे आहे जगाला मिठीत तुझ्या
ऊब प्रेमाची एवढी घेऊन तु ये.

सावळ तुझ्या कांतीवर
सौभाग्य लेनं माझं लेऊन तु ये,
फिरलेही असतील पाऊलं तुझी घरभर
पण, एकदा उंबरट्यावरचं माप ओलांडुन तु ये.

कितीही नाही म्हणटल तरी तुझ्या कडेच धावत


कितीही नाही म्हणटल तरी तुझ्या कडेच धावत ..........
डोळे बंद केले की तू असल्याचा भास होत
डोळे उघडले की तू नसल्याचा त्रास होतो
तू नसतानाही तू असल्याचा आभास होतो
तू नसतानाही तू माझी असल्याचा भास होतो

या भासातून तू कधी माझी होशील का?
कि हा भास भासच राहील,
तुझ्या भेटीसाठी मी आतुर आहे
कि तुझ्या भेटीविना ये जीवन संपून जाईल ...

संपवायला काय हे जीवन संपून जाईल
पण ते तुझ्याविना संपले याची हुरहूर राहील.
तुझ्याविना जगण्यापेक्षा तुझ्यासाठी जगणे मला आवडेल
तुला माझी करण्यापेक्षा तुला सुखात पाहणे मला आवडेल

बघ किती वेडा आहे मी आणि माझ मन
सतत तुझ्याच आठवणीत असत
कितीही नाही म्हणटल तरी
तुझ्या कडेच धावत

कितीही नाही म्हणटल तरी
तुझ्या कडेच धावत .................

पण तुझ्या मनाच काय


पण तुझ्या मनाच काय ....................
आता दारू पिण्यासाठी फक्त कारण लागत
पहिले कधीतरी घेत होतो
आता फक्त संध्याकाळी घेतो
पहिले एक कॉरटर लागत होती
आता जास्त नाही फक्त एक खंबा पितो

पिल्यानंतर मी एकदम शांत असतो
पण बाजूचेच उगाच बडबडतात
म काय मलाही चेव येतो
म त्याच्या सकट त्याच्या खानदानाला रस्त्यावर घेतो

तसा माझा काही वाईट विचार नसतो
पण घेतल्यावर मी कधीच हरत नसतो
तो मला काही बोलण्याआधीच
मी त्याचा गेम करून टाकतो .........

पियाल्यानंतर काही मजाच ओर असेत
कधी न दिसणारी ती
एकाच वेळी तीन चार जागी दिसते
म्हणूनच मी पितो

कारण पितान तरी मी माझा नसतो
आणि पिऊन झाल्यावर तरी कुणाचाच नसतो
म्हणूनच पिण्या आधी आणि पिल्यानंतर
मी एकांतात असतो

एकांत तसा बरा असतो पण तोच एकांत
नंतर नकोसा होतो
कारण त्या एकांतात उरते फक्त तुझी एक
आठवण

मिस करतो खूप तुला पण तुला काय त्याच
माझ्या सोबत हि दारू आहे पण तुझ काय
मी पिऊन बडबड तो तरी
पण तुझ्या मनाच काय ....................
पण तुझ्या मनाच काय ....................
पण तुझ्या मनाच काय ....................