Pages
Thursday, March 1, 2012
शिवबा म्हणे कशाला येवू पुन्हा आम्ही भूतलावर.
शिवबा म्हणे कशाला येवू पुन्हा आम्ही भूतलावर ??
नाही मावळे तिथे, नाही आऊसाहेब तिथे ...
पुन्हा उभारण्यासाठी "स्वराज्याचा लढा " नाही रक्त तेथील सळसळते ...
शिवबा म्हणे कशाला येवू पुन्हा आम्ही भूतलावर ???
नाही समय कोणाकडे ,नाही काळजी कोणाला कोणाची ....
वेळ पडली तर विकतील जमीर स्वताच..
शिवबा म्हणे कशालायेवू पुन्हा आम्ही भूतलावर ???
नाही काळीज सिंनेत, नाही मनगटात दम ...
पुरुषार्थ ही विसरलेले भूतलावरील माणूस ....
काळिमा ही फासला स्वतःच्या मुख्यावर ....
शिवबा म्हणे कशाला येवू पुन्हा आम्ही भूतलावर ???
विसरलं धर्मच आदर,विसरलं स्त्रीरांच मातृत्व ...
विसरलं कर्तव्य माता पित्याच ,विसरलं स्वाभिमान जगण्याच ...
लाजीरवाण्या आयुष्य जगण्यासाठी...
कशाला येवू आम्ही भूतलावर- शिवबा म्हणे !!!
------------------------------------------------------------------------------
एका समुदायावर हि कविता वाचली आणि खरच मनात आले
नका,
नका धनी, नका फिरू माघार...
हे असले उधवस्त स्वराज्य पाहून खूप हळ-हळ होईल तुमच्या वाघाच्या काळजाला. आठवतील तुमचे मावळे कारण इथे उरलेत आता फक्त कावळे....
तुमच्या शंभूबाळाला बदनाम केले या गनिमांनी, तुमच्याच जन्म तारखे बद्दल घालतात हे वाद...
नका धनी, नका फिरू माघार...
-----------------------------------------------------------------------------
-
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment