Pages
Thursday, March 1, 2012
हिंदू आमुचा बाणा.
हिंदू आहे तन मन आमुचे ,हिंदू आमुचा बाणा |
शंभू आहे दैवत आमुचे। शिवाजी आमुचा राणा ||
हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही "श्रीं" ची कल्पना |
हर हर महादेव रणात झुंजला, झाली एकचि वल्गना ||
कित्तेक कटले वीर इथे, कित्तेकांचा झाला खात्मा |
तरीही न झुकले शीर इथे, ना ही झुकला आत्मा ||
जगज्जेता आला इकडे, केली खूप गर्जना |
'पुरू'न उरला शूर जरीही, शत्रू न ठेवला विर्झना ||
यवन माजला, गनिम नाचला, घाबरला भारत सारा |
शिव-शंभूच्या पद स्पर्शाने वाहिला, एकत्वाचा वारा ||
काफर आला, काफर आला, गनिमास दिशा दिसेना |
हिंदुत्वाचा शन्ख फुन्कला, ही वीर मराठी सेना ||
हिंदुत्व आहे नीती आमुची, हिंदुत्व आमुचा कावा ||
हिंदूत्वासाठी जीवही देई, हा शूर मराठी छावा |
हिंदुत्व आहे शास्त्र आमुचे, हिंदुत्व आमुचे अस्त्र |
हिंदुत्व आहे तीर्थ आमुचे, हिंदुत्व आमुचे गोत्र |
|
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment