Pages

Saturday, September 8, 2012

तुझ्यावर प्रेम करणारा मी एकटाच असेन

तुझ्या देहाकडे बघून नेत्रसुख घेणारे बरेच असतील,
पण , " ओढणी सांभाळ " सांगणारा कदाचित मी एकटाच असेन ...! 
तुला हसवणारे बरेच असतील,
पण , तुझ्यासाठीच तुझ्यावर चिडणारा कदाचित मी एकटाच असेन ...! 
लगबगीत चालताना तुझ्या स्पर्शाची वाट पाहणारे बरेच असतील,
पण , " जपून चाल " सांगणारा कदाचित मी एकटाच असेन ... ! 
हसत -हसवत तुला टाळी देणारे बरेच असतील,
पण , तू रडताना, तुझा... हात हातात घेवून धीर देणारा कदाचित मी एकटाच असेन ...!
तुला कळावं म्हणून तुझी काळजी घेणारे बरेच असतील, 
पण , तुझ्या नकळत तुझ्यावर प्रेम करणारा मी एकटाच असेन ...! !

No comments:

Post a Comment